**दि.20.09.2023 नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता दि.31.10.2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दि.20.09.2023 किंवा त्यानंतर केवळ व्यायवसाईक अभ्यासक्रमास प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांनीच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा.** महत्वाची सुचना : प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थांनी द्यावयाची माहिती नमुना बदल झाला आहे. ** इ. 8 वी , इ. 11 वी तसेच पदवी, पदवीका, पदव्युत्तर व इतर अभ्यासक्रमाच्या फक्त प्रथम वर्षासाठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा महाविद्यालयाकडुन थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनीच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा. अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या वर्गासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही.**
समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह

शासकीय वसतिगृहाचे सन २०२३-२४ साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक

अ.क्र. अभ्यासक्रम ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी
शालेय विद्यार्थी दि.12.07.2023 पर्यंत
इ.10 वी 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि.31.07.2023 पर्यंत
बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम/ एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर,पदवी,पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि.31.07.2023 पर्यंत
4 व्यावसायिक अभ्यासक्रम दि.20.09.2023 पर्यंत

योजना राबविणे मागची उद्दिष्टे

मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत.


योजनेचे लाभाचे स्वरूप

1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हास इ.
5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता सुद्धा दिला जातो.


अटी व शर्ती

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील अटी व शर्ती लागू असतील
1. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
3. प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न रु. २,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.
4. इयत्ता ८ वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
5. अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ मे पूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० जून पर्यंत किंवा निकाल लागल्यापासून १५ दिवसांचे आंत.
6. सन २०१४ -१५ पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात जागेपैकी १०% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खासबाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरून व गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आणि ५% खासबाब म्हणून अनाथ तसेच मांग भंगी, मेहकर या जातीतील लाभार्थ्यांसना प्राधान्य् देण्यात येते.


संपर्क

1. संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
2. संबंधित गृहपाल , मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह.
3. संबधित विभागाचे प्रादेशिक उप्पायुक्त सामाज कल्याण.