समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह

शासकीय वसतिगृहाचे सन 2024-25 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक

अ.क्र. अभ्यासक्रम ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी
शालेय विद्यार्थी दि.10.07.2024 पर्यंत
इ.10 वी 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि.31.07.2024 पर्यंत
बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम/ एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर,पदवी,पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि.31.07.2024 पर्यंत
व्यावसायिक अभ्यासक्रम कळविण्यात येईन

शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी नियम

१. एकदा वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर वसतिगृह प्रमुखांच्या पूर्व संमतीशिवाय विद्यार्थ्याला अनुपस्थित राहता येणार नाही.

२. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या/तिच्या कॉलेजमध्ये नियमितपणे हजेरी लावली पाहिजे आणि रजेशिवाय कॉलेज किंवा वसतिगृहात गैरहजर राहू नये. गैरहजर राहिल्यास कारवाई करण्यात येईल.

३. वसतिगृह प्रमुखांच्या पूर्व संमतीशिवाय शाळा कॉलेजच्या वेळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे बाहेर जाऊ नये.

४. वसतिगृहात विनाशुल्क (फ्री) देण्यात आलेले साहित्य काळजीपूर्वक वापरावे व शैक्षणिक वर्षाअखेरीस सुस्थितीत परत करावे. हरविलेल्या किंवा निकामी केलेल्या वस्तूंची योग्य ती किंमत भरून देण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची राहील. साहित्य व्यवस्थित परत न केल्यास विद्यार्थ्यांस पुढील शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ही बाब शिक्षण संस्थांना कळविली जाईल.

५. विद्यार्थ्यांजवळ वसतिगृहातर्फे दिलेल्या आणि त्याच्या स्वतःच्या मौल्यवान वस्तु सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे विद्यार्थ्याची राहील.

६. शैक्षणिक वर्षातील सर्व परीक्षा देणे विद्यार्थ्याना बंधनकारक राहील.

७. अभ्यासक्रमातील प्रगती गुणवत्तापूर्ण असली पाहिजे, शैक्षणिक वर्षा अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेश रद्द केला जाईल.

८. प्रामुख्याने वसतिगृहातील खोल्या नीटनेटक्या आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. वसतिगृह प्रमुखांच्या परवानगीशिवाय खोल्या आणि खोल्यातील मांडणी विद्यार्थ्यांनी बदलू नये.

९. विद्यार्थ्याने आपली वर्तणूक वसतिगृहात सौजन्यशील ठेवावी. चळवळ, संप, अन्नसत्याग्रह, राजकीय कार्य, गटात घोषणाबाजी करणे अथवा तत्सम प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. तसेच वसतिगृह प्रतिष्ठेला बाधक होईल असे कोणतेही वर्तन करु नये.

१०. वसतिगृह व्यवस्थेत काही अडचण असल्यास वसतिगृह प्रमुखांच्या मदतीनेच ती सोडविली पाहिजे. गंभीर स्वरुपाचा अन्याय होत आहे, असे वाटले तर वसतिगृह प्रमुखाच्या पूर्व संमतीने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाद मागता येईल.

११. स्थानिक परिस्थितीनुसार वसतिगृह प्रमुख वेळोवेळी जे नियम करतील, ते विद्यार्थ्यांना बंधनकारक राहतील.

१२. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास याची कल्पना वसतिगृह प्रमुखांना ताबडतोब विद्यार्थ्यांनी द्यावी आणि औषधोपचार योजना वसतिगृह प्रमुखांनी सांगितलेल्या किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अथवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रथम करून घ्यावी.

१३. मेसमध्ये जेवताना, खाद्यपदार्थ घेतांना आरडाओरड करू नये तसेच मेस कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे.

१४. जे अन्न दिले जाते ते उष्टे टाकून वाया घालवू नये, आवश्यक तेवढेच अन्न ताटात घ्यावे.

१५. वसतिगृह प्रमुखांनी ठरवलेल्या वेळेवर जेवण घेण्यासाठी मेसमध्ये जाणे बंधनकारक राहील

१६. जेवणाबाबत काही तक्रार असेल तर याबाबत कार्यालय प्रमुखाकडे तक्रार करावी, परस्पर स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांशी वादावादी करू नये.

१७. कोणत्याही नातेवाईक किंवा मित्र किंवा इतर व्यक्तींना वसतिगृहात जाता येणार नाही तसेच रात्रीच्या वेळी राहू दिले जाणार नाही असे केल्यास प्रवेश तात्काळ रद्द केला जाईल. विद्यार्थ्यांच्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील खोलीवर जाता येणार नाही.

१८. विद्यार्थ्याने वसतिगृहात नियमित अभ्यास केला पाहिजे इतर विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वर्तन करू नये. वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांशी प्रेम व बंधुभावाने वागले पाहिजे तसेच कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे.

१९. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे व्यसन करू नये, तसे केल्याचे आढळल्यास प्रवेश तात्काळ रद्द केला जाईल.

२०. कोणत्याही कारणाशिवाय वारंवार गैरहजर राहणाऱ्या किंवा एका महिन्यापेक्षा जास्त काळ सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जातील.

२१. भ्रष्ट चारित्र्य किंवा गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले विद्यार्थी आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.

२२. संसर्गजन्य रोग असलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून कारवाई केली जाईल आणि आवश्यक वाटल्यास त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल.

२३. वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने कोणतेही प्राणघातक शस्त्र जवळ बाळगू नये.

२४. वसतिगृहातील खोल्यांच्या भिंती, खिडक्या आणि पायऱ्यांवर कोणतेही पोस्टर लावू नये, चित्रे काढू नये किंवा आक्षेपार्ह काहीही लिहु नये.

२५. वसतिगृहात प्रवेशासाठी सादर केलेले पुरावे भविष्यात खोटे असल्याचे आढळून आल्यास, अधिकाऱ्याने केलेली कोणतीही कारवाई विद्यार्थी/विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल, खोटी माहिती देऊन प्रवेश मिळवला असेल तर त्यावर कोणताही आक्षेप न घेता प्रवेश रद्द केला जाईल.

२६. प्रत्येक विद्यार्थी/मुलींनी वसतिगृहाचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.

२७. वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये परिचय व बंधुभाव वाढावा यासाठी वेळोवेळी राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करून एकोप्याचे वातावरण निर्माण करावे.

२८. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सण आणि इतर सरकारी प्रायोजित कार्यक्रमांना उपस्थित राहाणे बंधनकारक राहील.

२९. वसतिगृहातील विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केलेली असली तरी, विद्यार्थ्यांच्या हलगर्जीपणामुळे अथवा विद्यार्थ्यांच्या अतिउत्साहामुळे कोणतीही अनुचित घटना किंवा दुर्घटना घडल्यास अधिक्षकास जबाबदार धरता येणार नाही.

३०. राज्य सरकारने, वसतिगृह प्रमुख यांनी वेळोवेळी तयार केलेले नियम विद्यार्थ्यांना पाळावे लागतील.

३१. वसतिगृहातील वातावरण भयमुक्त व खेळकर राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे, कोणत्याही विद्यार्थ्यांकडून इतर विद्यार्थ्यांचे शारिरीक अथवा मानसिक शोषण (रॅगिंग) होत असल्याचे आढळल्यास रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.

मुलींच्या वसतिगृहासाठी पुरवणी नियम

१. प्रत्येक विद्यार्थिनीने सायंकाळी ७-३० चे आत वसतिगृहात परत आलेच पाहिजे.

२. कोणत्याही कार्यक्रमास रात्री साडेसात नंतर पूर्वपरवानगी शिवाय जाता येणार नाही.

३. विद्यार्थिनींना घरी जाण्यास सुट्टी देण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून अर्ज घ्यावा. त्यासोबत वसतिगृहातून जाण्याची तारीख, वेळ, त्याचप्रमाणे येण्याची तारीख व वेळ लिहून घ्यावी.

४. मुलींना वसतिगृहातील दूरध्वनीचा दुरुपयोग करता येणार नाही.

५. विद्यार्थिनींना भेटावयास येणाऱ्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांची रजिस्टरमध्ये नोंद ठेवावी. कोणास भेट द्यावी व कोणास भेट देऊ नये. याबाबत अधीक्षकेस निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार राहील.

६. वसतिगृहात मुलींच्या नातेवाईकांना अगर मैत्रिणीला राहण्यास परवानगी देण्यात येऊ नये.

७. ज्या मुलीचे वर्तन नियमाविरुध्द अगर आक्षेपार्ह आहे अशा मुलीबद्दल सविस्तर अहवाल वसतिगृह प्रमुखाने जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे पाठवावा व या अहवालाची प्रत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग व आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना द्यावी.

योजना राबविणे मागची उद्दिष्टे

मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत.


योजनेचे लाभाचे स्वरूप

1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हास इ.
5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता सुद्धा दिला जातो.


अटी व शर्ती

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील अटी व शर्ती लागू असतील
1. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
3. प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न रु. २,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.
4. इयत्ता ८ वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
5. अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ मे पूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० जून पर्यंत किंवा निकाल लागल्यापासून १५ दिवसांचे आंत.
6. सन २०१४ -१५ पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात जागेपैकी १०% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खासबाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरून व गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आणि ५% खासबाब म्हणून अनाथ तसेच मांग भंगी, मेहकर या जातीतील लाभार्थ्यांसना प्राधान्य् देण्यात येते.


संपर्क

1. संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
2. संबंधित गृहपाल , मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह.
3. संबधित विभागाचे प्रादेशिक उप्पायुक्त सामाज कल्याण.